७२ तुकडे
![]() |
| अनुपमा गुलाटी आणि तिचा पती |
आज हे का सांगतोय? कारण आपल्याकडे श्रद्धा हत्याकांड घडल्यावर त्यास जो काही धार्मिक रंग देण्याचा कयास केला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे. शिवाय #टिकलीचा रंगारंग कार्यक्रम देखील निव्वळ ढोंगीपणा आहे. त्यासह #JusticeforShraddha याने काही दिवसांचा मीडिया कंटेंट मिळतो बस. समाज बदलत नाही. अशाने बदलणार देखील नाही. तिन्ही मुद्दे सविस्तर लिहितो बघा पचवता येतात का!
धार्मिक रंग
'प्रेम - प्रेमभंग - वाद - घृणा - विध्वंस' या साखळीत कुठेही 'धर्म' नसतो. त्यास घुसवले जाते आणि तुमच्या आमच्यासारखे तरुण त्यास बळी जातात. एक लक्षात घ्या समाजात अशा विकृत घटना घडतात. त्याने माणुसकीला काळिमा फसला जातो त्यास जबाबदार किंवा पार्श्वभूमी धार्मिक नसते. जर ती 
श्रद्धा त्याच्या प्रियकरासह
असेल तर सर्व धर्मात या घटना घडल्या नसत्या. त्या तशा घडतात कारण समाज म्हणून कोणत्या वातावरणात आपण वाढतो, आपल्यावर होणारे संस्कार कसे आहेत, आपल्याला लाभलेली सांगत कशी आहे, आणि सर्वात महत्वाचं आपल्यासमोर असणारे आदर्श कोण यावर आपली वैचारिक जडणघडण होत असते.
... तरीही श्रद्धा टिकली नसती
आपले विना टिकली फोटो टाकले तेही वैचारिक पातळीवर किती खुजे आहेत हे पाहायला मिळालं. त्यामुळे आता घडलेलं श्रद्धा हत्याकांड असेल, वा तेव्हा घडलेलं अनुपमा हत्याकांड यांत टिकलीने तिळमात्र फरक पडणार नव्हता.
Justice फॉर?
तिसरा आणि शेवटचा मुद्दा #Justice चा. असले हॅशटॅग आणि दिवे लावून न्यायव्यवस्थेचे डोळे उघडले असते तर देशात २०२१ या एका वर्षात ३१,६६७ महिलांवर बलात्कार (नोंदणीकृत) झाला नसता. बिल्किस बानो प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा माफ मिळाली नसती. अनुपमाला न्याय मिळण्यासाठी ७ वर्ष लागले नसते. दिवे लावा, हॅशटॅग चालावा मला याबद्दल तिटकारा नाही. पण समस्येचं मूळ आपण जाणून घेणार आहोत का? समस्या सोडवण्यासाठी त्याच्या मुळाशी कधी जाणार? की आजही मुंबईच्या गर्दीला ठोस उपाय देण्याऐवजी मेट्रोचा पर्याय देणार?
आता तुम्हीच विचार करा आणि काय ते ठरवा. अन्यथा पुन्हा एक श्रद्धा आहेच. त्यावेळी नाव वेगळे असेल एवढाच काय तो फरक. पुढे पुन्हा ही साखळी सुरू राहणार..


0 Comments